शिंदे आणि फडणवीस सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार असं विधान ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्या प्रश्नावर भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे सरकार फेब्रुवारीनंतर टिकलं तर राज्यसभेचा राजीनामा देणार का? ज्या लेखणीने तुम्ही सामना पेपरमध्ये लिहिता. त्याच लेखणीने एक वाक्याचा राजीनामा तुम्ही देणार का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

हेही वाचा >>> VIDEO : विश्वजीत कदम देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, भाजपात जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण!

तसेच ते पुढे म्हणाले की, कार्यकर्ते टिकत नाही. त्यामुळे न पटणारी विधान ते करीत आहे. मी तुम्हाला आवाहन देतो की, तुमच्याकडे ताकद असेल शक्ती असेल, तसेच तुम्ही स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा सांगणारे असाल तर १५ मार्चपर्यंत सरकार पाडा, अन्यथा तुमचा वारसा नकली आहे. चांदयापासून बांदयापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत जनता तुमचा निषेध करेल, अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली.