नववर्षाच्या मध्यरात्री पाषाण भागातील घटना

पुणे : मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याला शंभर रुपये न दिल्याने एका महाविद्यालयीन युवकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना पाषाण भागात मध्यरात्री घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा पंजा तुटला असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आशुतोष अर्जुन माने (२४, रा. दुर्वांकुर सोसायटी, पंचवटी, पाषाण) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मानेचा मित्र पंकज अनंत तांबोळी (वय २५, रा. पाषाण ) याचा डावा हात मनगटापासून कापला गेला आहे. या प्रकरणी प्रणव काशीनाथ वाघमारे (वय १८, रा. शिक्षक कॉलनी, सूस रस्ता, पाषाण) आणि गौरव गौतम मानवतकर (वय २०, रा. तोंडेचाळ, सुतारवाडी, पाषाण) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या बरोबर असलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मोबाइल चोरी करणारी दिल्लीतील महिला अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज तांबोळी आणि त्याचे मित्र पाषाण परिसरात राहायला आहेत. पंकज एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. खाणावळ बंद असल्याने पंकज आणि त्याचे मित्र मध्यरात्री पाषाण परिसरातील साई चौकात जेवण करायला गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपीनी त्याच्याकडे शंभर रुपयांची मागणी केली. पंकजने आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्याचा हाताचा पंजा कापला गेला. या घटनेची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंकजला तातडीने रुग्णालयात दाखल केले. चतु:शृंगी पोलिसांकडून पसार अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे.