पुणे : पुणे मेट्रोच्या सेवेला महावितरणुळे सोमवारी ब्रेक लागला. वीजपुरवठा खंडित झाल्याने वनाझ ते रूबी हॉल मार्गावरील सेवा सायंकाळी २० मिनिटे ठप्प झाली. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर अखेर सेवा पुन्हा सुरू झाली.

मेट्रोच्या वनाझ ते रूबी हॉल मार्गावरील वीजपुरवठा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडित झाला. त्यामुळे या मार्गावरील सेवा बंद झाली. महावितरणकडून या मार्गावरील वीजरपुरवठा सुरळीत करण्यास सुमारे २० मिनिटांचा कालावधी लागला. त्यानंतर पुन्हा या मार्गावरील सेवा पूर्ववत झाली, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.

Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
Water supply to Ulve,
उलवे, खारघर, तळोजासह द्रोणागिरीला पाणी पुरवठा शुक्रवार ते शनिवार बंद राहणार
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ

वीजपुरवठा खंडित झाल्याने मेट्रो गाड्या स्थानकावरच थांबून होत्या. याबद्दल अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमावर तक्रारी केल्या. प्रवाशांनी मेट्रो सेवा बंद पडण्याची विचारणाही केली. मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे उद्धाटन झाल्यानंतर आठवडाभरातच मेट्रो सेवा बंद पडू लागली असून, हे विश्वास बसण्यासारखे नाही, अशी टीका एका प्रवाशाने केली.