पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४७७७ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे ७४५ आणि ५६१ घरांचा समावेश आहे. या सोडतीसाठी शुक्रवारपासून (८ मार्च) अर्ज भरता येणार आहेत.

म्हाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील या वेळी उपस्थित होते. गुरुवारपासून (७ मार्च) नोंदणीला सुरुवात करण्यात आली, तर अर्ज शुक्रवारी दुपारी तीनवाजल्यापासून भरता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १० एप्रिल रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे. अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे, असे सभापती आढळराव यांनी सांगितले.

mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Saatvya Mulichi Saatvi Mulgi Netra will kill astika director opened up about upcoming twists in serial
“अस्तिकाचा वध नेत्राच्या हातून…”; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या दिग्दर्शकांनी केला खुलासा

हेही वाचा >>>राज्यातील शाळांमध्ये २ ते ४ एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन;  पाचवी, आठवीची स्वतंत्रपणे वार्षिक परीक्षा

दरम्यान, म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी पाटील यांनी केले.

सोडतीचा तपशील योजना आणि सदनिका याप्रमाणे

– म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६

– म्हाडाच्या विविध योजना – १८

– म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९

– पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८

– २० टक्के योजना पुणे महापालिका ७४५ आणि पिंपरी-चिंचवड ५६१ एकूण ४७७७ सदनिका