उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने या भागातून थंड वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध शहरांच्या किमान तापमानात पाच ते सहा अंश सेल्सिअसने घट झाली. त्यामुळे राज्यात मंगळवारपासून थंडीचे पुनरागमन झाले आहे. पुढील १५ दिवस राज्यात कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>उच्च शिक्षणाच्या आठ सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर

राज्याच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात औरंगाबाद शहराचे किमान तापमान १०.३ अंश सेल्सिअस इतके सर्वात कमी नोंदविले गेले. गेले २० दिवस ढगाळ वातावरणामुळे राज्यातील सर्वच शहरांचे किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसवर गेले होते. परिणामी ऐन थंडीत नागरिकांना उकाडा जाणवत होता. मात्र, आता ढगाळ वातावरण नाहिसे झाले असून आकाश निरभ्र झाले आहे. तसेच उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने त्या भागातून थंड वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे राज्यातील शहरांच्या किमान तापमानात पाच ते सहा अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

हेही वाचा >>>‘जेईई मुख्य’साठी ७५ टक्क्यांची अट; राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाचा निर्णय; विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापुरात गारठा वाढला आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिकमध्येही नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि उदगीर, तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत पारा घसरला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे मंगळवारचे कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
शहर कमाल किमान
औरंगाबाद ३०.८ १०.४
पुणे ३१.३ ११.४
कोल्हापूर ३१.८ १६
सांगली ३२.४ १४.६
सातारा ३०.४ १३.९
मुंबई ३३.२ २३.२
सोलापूर ३३.२ १६.५
रत्नागिरी ३५ १९.३
नाशिक ३०.१ १२.६
नागपूर २९.४ १२.४
जळगाव ३०.६ १२

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state experienced increased cold winter pune print news psg 17 amy
First published on: 21-12-2022 at 09:49 IST