पुणे जिल्हा परिषदेच्या मार्केट यार्ड येथे होत असलेल्या अभिलेख कक्षाचे अंदाजपत्रक चुकल्याने निधीची कमतरता पडली आहे. परिणामी हा अभिलेख कक्ष रखडला आहे. जिल्हा परिषदांचे सर्वांगीण डिजिटायझेशन केले जात असताना सर्व कागदपत्रांचे अभिलेख सुरक्षित राहण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या अभिलेख वेगवेगळ्या ठिकाणी आणि बऱ्याच वेळा कार्यालयामध्ये संग्रहित केले जाते. ऐनवेळी फाईल शोधणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने केंद्रीय विदा केंद्र (सेंट्रल डेटा वेअर हाउसिंग) उभरण्याचे ठरविण्यात आले आहे.

हेही वाचा- आचारसंहितेमुळे पुणे जिल्हा ग्रामपंचायतींमधील कामांच्या प्रशासकीय मान्यता लांबणीवर

आता निधीच शिल्लक नसल्याने काम पुढील काही दिवस रखडणार आहे. जिल्हा परिषदेची सन १९६२ पासूनची कागदपत्रे तसेच वेळावेळी झालेल्या सभा, ठराव, कर्मचारी भरती, महत्त्वाची कागदपत्रे यांची माहिती, तसेच नकला वेळेवर उपलब्ध होत नाहीत. अनेकदा आग लागणे, माहितीची चोरी, फाईल गहाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कागदपत्रांच्या आधुनिकाकरणाबरोबरच त्याची जपणूक आणि साठवणूक योग्य पद्धतीने करण्यासाठी जिल्हा परिषदेने यापूर्वीच प्रयत्न केले आहेत. सर्व जुने अभिलेख उपलब्ध होणार आहे, अशा पद्धतीने व्यवस्था केली जाणार आहे. आता जिल्हा परिषद प्रशासनाला काम पूर्ण होण्यासाठी निधीची वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा- पिंपरीत उपोषणाला बसलेले कामगार रुग्णालयात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुन्या नोंदी ठेवण्यासाठी जुन्या गोदामचे अत्याधुनिक फाइल गोदामात जिल्हा परिषद मार्केटयार्ड येथे रुपांतर करीत आहे. या ठिकाणी पाणी आणि अग्निरोधक यंत्रणा उभारण्यात येत आहे. एका कक्षाचे काम पूर्णत्वास जात आहे, मात्र दुसऱ्या कक्षासाठी निधीची आवश्यकता आहे. निधीची आम्ही जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) मागणी करणार आहोत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी द