पिंपरी : पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम उपायांद्वारे ऊर्जेची उपलब्धता आणि शाश्वतता यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी थरमॅक्स कंपनी देशभरात पाच बायो सीएनजी प्रकल्प उभारणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत.

थरमॅक्स फेस्टच्या कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रात दोन, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी एक असे पाच प्रकल्प उभारले जाणार आहेत. दररोज ११० टन बायो सीएनजी उत्पादनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पात दररोज एक हजार टनांहून अधिक स्थानिक कच्च्या मालाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये भाताचा पेंढा, नेपियर गवत, उसाची चिपाडे आणि सोयाबिनचा कचरा आदींचा समावेश आहे. तयार झालेला बायो सीएनजी ग्राहकांद्वारे व्यावसायिक व नियंत्रित वापरासाठी उपयोगात आणला जाणार आहे.

हेही वाचा – जीवन गुणवत्ता निर्देशांकात पुण्याला देशात दुसरा क्रमांक

हेही वाचा – पिंपरी : कट मारल्याने टोळक्याची वकिलाला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष भंडारी म्हणाले, की थरमॅक्स भारतातील ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ऊर्जा आव्हानांवर मात करण्यासाठी कचऱ्याचे रुपांतर ऊर्जेत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा पाया घातला आहे. हायब्रिड नूतनीकरणीय ऊर्जा, जैवइंधने, ग्रीन हायड्रोजनसह अनेक नवनवीन क्षेत्रांत गुंतवणूक करत आहोत.