पुणे : राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर आणि त्यापूर्वीचा महाराष्ट्र बघितला. तर आपल्याला परिस्थिती लक्षात येईल. आपण आपल्या महापुरुषांना आणि संताना कधीही आडनावाने किंवा जातीने बघितलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या गोष्टी सुरू झाल्या. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. राज्यात जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी काल विदर्भ दौर्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर शरद पवार गटातील अनेक नेतेमंडळी आक्रमक झाल्याच पाहण्यास मिळत आहे.
आणखी वाचा-पुणे : वीर गोगादेव उत्सवानिमित्त लष्कर भागात उद्या वाहतूक बदल
त्याच दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे पुणे दौर्यावर होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले की, काही जातीपातीच राजकारण नाही. शरद पवार हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आयुष्यभर चालले आहेत. देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यातील पुरोगामीत्व टिकविण्यासाठी शरद पवार हे पूर्ण ताकदीने काम करीत आहेत. त्यामुळे जाती पातीच राजकारण दुसरी लोक करित आहेत. त्या लोकांबाबत बोलल तर मी समजू शकतो. पण शरद पवार यांनी कधीही जाती पातीच राजकारण केल नाही. समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठ करण्याच काम शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या (राज ठाकरे) आरोपात काही तथ्य नसल्याची भूमिका मांडत जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.