पुणे : धनकवडीत ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून गळ्यातील ८० हजारांचा सुवर्णहार हिसकावून पसार झालेल्या चाेरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.

विक्रम माणिक पारखे (वय २१, रा. रवी पोळ बिल्डींग, बालाजीनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रंगपंचमीच्या दिवशी तक्रारदार ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर भागातील मैदानाजवळून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा महिलेजवळ थांबला आणि त्याने महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकला. काही कळायच्या आत चोरटा महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा सुवर्णहार हिसकावून पसार झाला.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

हेही वाचा – पुणे: मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वे गाड्या रद्द

हेही वाचा – पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; राजेंद्रनगर परिसरातील घटना

पसार झालेल्या चोरट्याने ओळख लपविण्यासाठी चेहऱ्याला रंग लावला होता. त्यामुळे त्याचे वर्णनही ज्येष्ठ महिलेला सांगता आले नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, बापू खुटवड, भुजंग इंगळे, संजय गायकवाड, सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सूतकर आदींनी तपास सुरू केला. ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा बालाजीनगरमधील पवार हाॅस्पिटलजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पारखेला पकडले. चौकशीत त्याने ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली.