पुणे : पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ऐवज चोरून नेल्याच्या घटना सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरात चोरट्यांनी बतावणी करुन एका ज्येष्ठ महिलेकडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गणेशमळा परिसरात राहायला आहेत. त्या शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ज्येष्ठ महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतविले. महिलेचे लक्ष नसल्यचाी संधी साधून चोरट्यांनी पिशवीतील दागिने आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

हेही वाचा…स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोंढवा भागातील टिळेकरनगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाकडील बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ८० हजार रुपयांची सोनसाखळी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक टिळेकरनगर भागातून निघाले होते. थ्री ज्वेलस सोसायटीसमोर चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांच्याकडे हनुमान मंदिर कोठे आहे, अशी विचारणा केली. माझ्या मावशीचा मृत्यू झाला आहे. सूतक असल्याने मंदिरात जाऊ शकत नाही. दोन हजार रुपये दान करायचे आहे, अशी बतावणी केली. चोरट्यांनी त्यांना पाचशे रुपयांच्या चार नोटा दिल्या. तुमच्या गळ्यातील सोनसाखळी नोटेला लावा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर नोोटेत सोनसाखळी गुंडाळण्याचा बहाणा केला. ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी चोरुन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.