पुणे : शहर परिसरात विवाहितांचा विविध कारणांवरून छळ करण्याचे प्रकार घडत असून हडपसर, लोणी काळभोर, फुरसुंगी पाेलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल केले आहेत. हडपसर भागात एका महिलेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासूसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती रामदास धनशीर, सासू सुंदराबाई, दीर लक्ष्मण, उर्मिला कांबळे (सर्व रा. बिदर, कर्नाटक) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचा सासू, पतीकडून छळ करण्यात आल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार शिंगाडे तपास करत आहेत.

चारित्र्याचा संशय घेऊन महिलेचा छळ केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पती राम जरिचंद तगारे, सासू सुनीता, दीर राहुल, नणंद माधुरी संदीप पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार गुरव तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोटारीसाठी विवाहितेचा छळ

माहेरहून महागडी मोटार घेऊन ये, अशी मागणी करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी लोणी काळभाेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सौरभ सुनील सातव, सासू सविता, सासरे सुनील (रा. उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता), नणंद साक्षी प्रतीक बोराटे, पतीची मैत्रीण अपूर्वा रमेश कड, मावशी विद्या भूमकर, अतिश भूमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचा पाच महिन्यांपूर्वी सौरभ सातव याच्याशी विवाह झाला होता. विवाहात हुंडा कमी दिला. माहेरहून महागडी मोटार घेऊन ये, अशी मागणी करून आरोपींनी छळ केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक बाेबडे तपास करत आहेत.