लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना हडपसर भागातील एका ज्येष्ट महिलेने पाळलेले तीन बोकड आणि एक शेळी चोरीला गेल्याच घटना घडली. बोकड आणि शेळी चोरीला गेल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आणि पोलिसांनी सात दिवसांनी बोकड, शेळी चोरीचा गुन्हा दाखल केला. बोकड, शेळी चोरणाऱ्या चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हडपसर भागातील गोंधळेनगर परिसरात तक्रारदार राहायला आहेत. त्यांच्या घराजवळ कालवा आहे. घरासमोर मोकळी जागा असल्याने त्यांनी बोकड आणि शेळी पाळली आहे. त्यांनी कालव्यासमोरील मोकळ्या जागेत १२ नोव्हेंबर रोजी तीन बोकड आणि एक शेळी बांधून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तीन बोकड आणि शेळी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बोकड आणि शेळीचा शोध घेतला. मात्र, बोकड आणि शेळी न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सात दिवसानंतर पोलिसांनी याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, कोरेगाव पार्क भागात वाहतूक बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी चोरट्यांनी येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर असलेल्य मिठाई विक्रीच्या दुकानाचा दरवाजा उचकटून अडीच किलो आंबा बर्फी, रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. वारजे भागातील एका दुकानातून सुकामेवा चोरून नेण्यात आल्याची घटना घडली होती.