पुणे : बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तीन शाळकरी मुलींचा शाेध पोलिसांच्या तत्परतेमुळे लागला. मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. मुली कल्याणमधील आंबिवली भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

बिबवेवाडी भागात तीन मुली राहायला आहेत. तिघी मैत्रिणी आहेत. २ सप्टेंबर रोजी शाळकरी मुली किराणा दुकानात खरेदीसाठी बाहेर पडल्या. त्यानंतर त्या व्हीआयटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्या. मुली घरी परतल्या नसल्याने पालक घाबरले. १२ आणि १५ वर्षांच्या दोन मुली एकाच भागातून बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मुलींची छायाचित्रे सर्व पोलीस ठाण्यांमधील समुहात प्रसारित करण्यात आली. मुलींच्या मित्र-मैत्रीणींकडे चैाकशी करण्यात आली.

हे ही वाचा…पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदार बापू पठारे यांच्यासह सहा नगरसेवकांची दांडी; चर्चेला उधाण

तांत्रिक तपासात मुली कल्याणमधील आंबिवली परिसरात असल्याची माहिती मिळाली. ठाण्यातील खडकपाडा पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती देण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी मुलींची छायाचित्रे पाठविण्यात आली. पोलिसांनी तिघींना ताब्यात घेतले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. मुलींना ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक पुण्यात पोहोचले.

हे ही वाचा…Pmc Health Department : शहरबात – महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुखणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोजकुमार लाेंढे, सहायक निरीक्षक विद्या सावंत, उपनिरीक्षक अशोक येवले, विशाल जाधव, प्रतीक करंजे, वर्षा ठोंबरे यांनी ही कामगिरी केली.