हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) शहरातून रविवारी (९ ऑक्टोबर) मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे नाना पेठ, लष्कर भाग तसेच लक्ष्मी रस्त्यावरील (संत कबीर चौक ते हमजेखान चौक) वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.नाना पेठेतील मनुशाह मशिद परिसरातून मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. संत कबीर चाैक, ए. डी. कॅम्प चौक, भारत टाॅकीज, पदमजी पोलीस चौकी, निशांत टाॅकीज, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, मुक्तीफौज चौक, बाबाजान दर्गा चौक, छत्रपती शिवाजी मार्केट, भोपळे चाैक, महात्मा गांधी रस्ता, कोहिनूर चौक, महावीर चौक, साचापीर स्ट्रीट, महात्मा फुले चौक, संत कबीर चौक, लक्ष्मी रस्ता, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक या मार्गाने मिरवणूक जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील बेकायदा प्रवेशांना मान्यता नाही ; सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांचे स्पष्टीकरण

गोविंद हलवाई चौकातून मिरवणूक उजवीकडे वळून सुभानशहा दर्गा चौक येथेे जाणार आहे. त्यानंतर सिटीजामा मशीद येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. मिरवणूक ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद केली जाणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes on sunday on the occasion of prophet birth anniversary pune print news amy
First published on: 07-10-2022 at 22:22 IST