पुणे : पुणे-दौंड लोहमार्गावर हडपसर ते लोणी स्थानकाच्या दरम्यान उपरस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे २६ मे रोजी या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत होणार असून, लांबपल्ल्याच्या काही गाड्या दोन ते सहा तास विलंबाने धावणार आहेत.

पुणे ते विरांगना लक्ष्मीबाई (झाँसी) ही उन्हाळा विशेष गाडी पुण्याहून दुपारी ३.१५ ऐवजी रात्री ९.३० वाजता सुटेल. पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस दुपारी ४.१५ ऐवजी संध्याकाळी ६.१० वाजता पुणे स्थानकावरून सोडण्यात येईल. पुणे-जम्मुतावी झेलम एक्स्प्रेस पुण्यातून सुटण्याची वेळ संध्याकाळी ५.२० आहे. मात्र, ही गाडी संध्याकाळी ६.४५ वाजता सोडण्यात येईल. पुणे-नागपूर ही गाडी संध्याकाळी ५.४० ऐवजी संध्याकाळी ७.०० वाजता पुणे स्थानकावरून सुटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नई येथून येणारी चेन्नई- लोकमान्य टिळक एक्स्प्रेस कुर्डूवाडी, मिरज या बदललेल्या मार्गाने पुणे स्थानकावर येऊन मुंबईकडे रवाना होईल. रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कालावधीत जम्मूतावी-झेलम एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन- वास्को गोवा एक्स्प्रेस, लखनऊ-पुणे एक्स्प्रेस, विरांगना लक्ष्मीबाई (झाँसी) उन्हाळी विशेष एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस पुणे विभागातून काही काळ विलंबाने धावतील, असे पुणे रेल्वेकडून कळिवण्यात आले आहे.