शिरूर : शिरूर-चौफुला रस्त्यावर आंधळगाव येथे मालवाहू वाहनाची धडक बसल्याने मोटारसायकलवरील दोघे जण मृत्युमुखी पडले.संदीप रोहिदास मदने (वय ३२, रा. नागरगाव, ता. शिरूर) आणि विक्रम महादेव सकट (वय ३२, रा. आंधळगाव, ता. शिरूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप मदने आणि विक्रम सकट हे मोटारसायकलवरून नागरगाव येथून आंधळगाव फाट्याकडे कामावर चालले होते. सकट हे मोटारसायकलवर मागे बसले होते. त्या वेळी मालवाहू वाहनाची धडक मोटारसायकलला बसली. त्यामध्ये दोघे मरण पावले. मालवाहू वाहनचालक दत्तात्रय रामचंद्र कदम (वय ३२, रा. रामलिंग, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.