पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओैंढे पुलाजवळ सेवा रस्त्यावर थांबलेल्या वाहनावर भरधाव टेम्पो आदळून टेम्पोचालकासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. टेम्पोचालक सुनील जालिंदर कांबळे (वय ४०, रा. कळंबी, ता. विटा, जि. सांगली), विष्णू भीमराव गाडे (वय ५५, रा. राजापूर, ता. तासगाव, जि. सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सांगलीहून मुंबईला द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो निघाला होता. द्रुतगती मार्गावर लोणावळा परिसरात ओैंढे पुलाजवळ सेवा रस्त्यावर एक वाहन थांबले होते. टेम्पोचालक कांबळे यांचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो सेवार रस्त्यावर थांबलेल्या वाहनावर आदळला. अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा…पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत जेरबंद; १२ दुचाकी जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची महिती मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा ग्रामीण पोलीस, रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक, आयआयबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोच्या केबीनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ओैंढे पुल परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त टेम्पो बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.