पुणे : गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणातील १६ आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार गणेश मारणे, आणि विठ्ठल शेलार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

गुंड शरद मोहोळचा खून ५ जानेवारी रोजी कोथरुड भागातील सुतारदरा परिसरात झाला होती. याप्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार, तसेच साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. सध्या ते येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
I have Been Framed Said Sanjay Roy
Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?
In Nagpur father shot his son in leg with his licensed gun
बापाने मुलावर गोळी झाडली, तरीही न्यायालयाकडून हत्येचा गुन्हा रद्द… कारण,…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Man Assaults Woman In Greater Noida
VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण
fraud with the lure, virtual currency, Hadapsar police,
पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक, हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…वरातीमागून घोडं: पुण्यात आता मध्यरात्रीनंतर नाकाबंदी, मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेकडून ९० दिवसांची मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने पुन्हा मुदतवाढ घेतली होती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि पथकाने तपास केला. मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुरुवारी दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.