पिंपरी: माजी महापौर, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मुंबईत ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून वाघेरे यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड, मावळमधून चांगले मताधिक्य मिळाले पाहिजे.

मावळातून गद्दारी गाडायला सुरुवात करायची आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, शहरप्रमुख सचिन भोसले यावेळी उपस्थित होते.

Shinde Group Leader Criticized Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, सोनिया गांधींचे…”, शिंदे गटातल्या नेत्याची घणाघाती टीका
Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
Uday Samant, Uddhav thackeray, Uddhav thackeray working style, Uday Samant criticise Uddhav thackeray, party mla left Uddhav thackeray, victory Confidence in mahayuti, lok sabha 2024,
“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”

हेही वाचा… नववर्ष स्वागतासाठी गर्दी; डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत उद्या असा होणार बदल

उद्धव ठाकरे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून शिवसेना जिंकत आली आहे. सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीने सर्वजण इकडे आले आहेत. मावळमध्ये प्रचाराला नक्की येणार आहे. हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या वेगळा आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश आहे. रायगड मधील पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. त्यांनी द्याल तो उमेदवार असे सांगितले आहे. त्यामुळे आता पिंपरी, चिंचवड, मावळमधून चांगले मताधिक्य मिळाले पाहिजे. मावळातून गद्दारी गाडायला सुरुवात करायची आहे.