पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (यूजीसी-नेट) लांबणीवर टाकण्यात आला आहे. आता निकाल १७ जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.

एनटीएने परिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. एनटीएतर्फे देशभरातील २९२ शहरांमध्ये ६ ते १९ डिसेंबर या कालावधीत नेट परीक्षा घेण्यात आली. ९ लाख ४५ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल १० जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे एनटीएने घोषित केले होते. मात्र मिचौंग वादळामुळे चेन्नई, आंध्र प्रदेशातील उमेदवारांना विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या नियोजनानुसार १० जानेवारीऐवजी १७ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती https://ugcnet.nta.ac.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.