नवी सांगवी येथील नदीपात्रात महापालिकेने बांधलेली सीमाभिंत पाडून त्याचे सपाटीकरण करून त्यावर अनधिकृत पत्राशेड उभारण्यात आल्याचा प्रकार तपासणी पथकाच्या पाहणीत उघड झाला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत येत्या १५ दिवसांत पाडलेले बांधकाम पुन्हा करण्याचे व तेथील पत्राशेड काढून टाकण्याची कारवाई करण्याची शिफारस पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
नव्या सांगवीत पवना नदीच्या पात्रात अनधिकृतपणे पत्राशेड उभारण्यात आले आहे, अशी तक्रार मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निवेदनाद्वारे केली, तेव्हा सहायक आयुक्त शहाजी पवार यांच्या पथकास आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व त्याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. पालिकेने नदीपात्रात बांधलेली सीमाभिंत १२ ते १५ फूट तोडण्यात आली होती. नदीपात्रात १५ फूट भराव टाकून त्याची उंची वाढवण्यात आली होती व त्याचे सपाटीकरण करण्यात आले होते. तयार झालेल्या जागेवर ट्रक, जीप, मिनी बस उभी करण्यात येत होती. त्यासाठी अनधिकृतपणे पत्राशेड उभारण्यात आल्याचे पवार यांच्या पथकास आढळून आले होते. यासंदर्भात, पाडलेली भिंत नव्याने बांधण्याची व पात्रातील भराव काढून टाकण्याची सूचना पवार यांनी स्थापत्य विभाग तसेच प्रभाग अधिकाऱ्यांना केली आहे. त्याचप्रमाणे, सपाटीकरण केलेल्या जागेवर उभारण्यात आलेले पत्राशेड काढून टाकण्याची कारवाई करण्याची शिफारसही कार्यकारी अभियंत्यांना करण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2013 रोजी प्रकाशित
नदीपात्रातील सीमाभिंत पाडून बांधले अनधिकृत पत्राशेड
नवी सांगवी येथील नदीपात्रात महापालिकेने बांधलेली सीमाभिंत पाडून त्याचे सपाटीकरण करून त्यावर अनधिकृत पत्राशेड उभारण्यात आल्याचा प्रकार तपासणी पथकाच्या पाहणीत उघड झाला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत येत्या १५ दिवसांत पाडलेले बांधकाम पुन्हा करण्याचे व तेथील पत्राशेड काढून टाकण्याची कारवाई करण्याची शिफारस पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
First published on: 16-03-2013 at 01:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorised shed at riverside in sangvi