पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एक अनोखे ध्वजारोहण पाहायला मिळाले. समाजपासून दूर जात असलेल्या तृतीयपंथी यांच्या हस्ते खासगी शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले. हा उपक्रम नाना काटे यांच्या माध्यमातून राबवण्यात आला. तृतीयपंथी यांच्याकडे नेहमीच वेगळ्या नजरेने पाहिल्या जाते. मात्र, त्यांना देखील त्यांचा समान हक्क मिळाला पाहिजे या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

तृतीयपंथी निकिता मुख्यादल यांनी देखील समाधान व्यक्त केला असून याचप्रमाणे समाजातील प्रत्येक गोष्टीत आमचा विचार करण्यात यावा असे आवाहन देखील त्यांनी केल आहे. देशभर ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील शासकीय आणि खासगी अशा दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आहे.

हेही वाचा – धक्कादायक ! पुण्यातील सरकारी वकील महिलेने घेतली दहा हजारांची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

हेही वाचा – पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना पकडले, दोन पिस्तुलांसह चार काडतुसे जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपळे सौदागर येथील खासगी शाळेत साजरा करण्यात आलेला स्वातंत्र्य दिवस अनोखा ठरला. माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह तृतीयपंथी निकिता मुख्यादल यांनी ध्वजारोहण केलं. असा योगायोग पहिल्यांदाच आला की तृतीयपंथी व्यक्तीला ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. यामुळे निकिता मुख्यादल यांनी समाधान व्यक्त केले. लाडकी बहीण यासह इतर योजनांमध्ये देखील तृतीयपंथी व्यक्तींना सामावून घेण्याचे आवाहन सरकारला त्यांनी केल आहे.