scorecardresearch

पुणे पोलिसांच्या युनिट २ ने १२ दिवसात १८५ कोयते आणि ७० आरोपींना घेतले ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंगने दहशत पसरवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेची पुणे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून या आरोपींच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या युनिट २ ने १२ दिवसात १८५ कोयते आणि ७० आरोपींना घेतले ताब्यात
पुणे पोलिसांच्या युनिट २ कडून ८५ कोयते आणि ७० आरोपीं ताब्यात

पुणे शहरात मागील काही महिन्यापासून कोयता गँगने धुमाकूळ घातल्याने, हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून अशा घटना घडू नये यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी काल दिली. त्यानंतर पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणार्‍या विरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा- विश्लेषण : पुण्यातील कोयता गँगची दहशत कोण मोडणार?

युनिट २ चे क्राईम पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या पथकाने स्वारगेट डायस प्लॉट येथून अक्षय आप्पाशा कांबळे आरोपींकडून तब्बल ९ कोयते ताब्यात घेतले आहे. तर १ जानेवारी २०२३ ते आजअखेर युनिट २ च्या हद्दीत १८५ कोयते आणि ७० आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा- भारतीय डॉक्टरने विकसित केले तोंडाच्या कर्करोगावरील औषध, जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून दखल

या कारवाईबाबत माहिती देताना युनिट २ चे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, शहरातील विविध भागात कोयते हातात घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या घटना समोर आल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात कॉम्बिग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्या दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डायस प्लॉट येथे आरोपी अक्षय आप्पाशा कांबळे याची झडती घेतली. त्यावेळी त्या आरोपींकडून तब्बल ९ कोयते ताब्यात घेतले आहे. त्या आरोपीकडे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 15:01 IST

संबंधित बातम्या