– राहुल खळदकर

विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राज्यधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहराचे नाव गुन्हेगारी टोळ्यांच्या उपद्रवामुळे बदनाम होत आहे. या टोळ्यांची सामान्य नागरिकांत कमालीची दहशत आहे. गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात कारवाईसाठी पोलिसांनी ‘मोक्का’ कायद्याचे (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अस्त्र उपसले. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके, साथीदारांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याने शहरातील गुन्हेगारीवर वचक बसेल, असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून कोयता गँगने दहशत माजविल्याच्या घटना वाढीस लागल्या. गुन्हेगारी टोळ्यांना जरब बसविल्यानंतर कोयता गँग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

four in critical condition one dead due to poisoning pesticide
बुलढाणा : फवारणीतून विषबाधा! चोघे अत्यावस्थ, एकाचा मृत्यू
Kalyan, Dombivli, army job fraud, Manpada police, fake appointment letters, youth scam, police investigation, kalyan news, thane news,
सैन्य दलात भरतीचे आमिष दाखवून डोंबिवली, कल्याणममधील भामट्यांकडून ४६ लाखाची फसवणूक
Anganwadi Workers, Anganwadi Workers Agitation, Unfulfilled Promises , Anganwadi Workers Agitation, latest news, loskatta news,
अंगणवाडी सेविकांचे असहकार आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Drug inspector arrested for asking bribe to open drug shop in Kalyan
कल्याणमध्ये औषध दुकान सुरू करण्यासाठी लाच मागणारा औषध निरीक्षक अटकेत
Irregularities in government onion purchase two officers of Nafed arrested
सरकारी कांदा खरेदीत अनियमितता, नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी
Chandrapur, criminals, crime, Chandrapur latest news,
महाकालीची नगरी ते गुन्हेगारांचे शहर, का बदलतेय चंद्रपूरची ओळख ? राजकारण्यांनी पोसून ठेवलेल्या…
 Poison in food 28 people including five children affected
जेवणात टाकले विष, पाच चिमुकल्यांसह २८ जणांना बाधा; तीन अत्यवस्थ
Spore forming bacterium
Anthrax cases in India : ओडिशात आढळले दोन अँथ्रॅक्स संक्रमित रुग्ण; काय आहेत लक्षणं?

कोयता गँग आहे तरी काय ?

परिसरात जरब निर्माण करण्यासाठी अल्पवयीन मुलांनी भरस्त्यात कोयते उगारून दहशत माजविल्याच्या घटना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाढीस लागल्या. कोयत्याचा धाक दाखवून खाद्यपदार्थ विक्रेते, व्यापाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाले. नागरिकांना धमकावून दहशत माजविण्यात आली. हडपसरमधील मांजरी भागातील ग्रामस्थांनी महिन्याभरापूर्वी कोयता गँगच्या दहशतीमुळे थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात कोयता गँगवर कारवाईची मागणी केली. याच काळात शहरातील वेगवेगळ्या भागात दहशत माजविण्याच्या घटना घडल्या. कोयते उगारून हप्ते वसुली करणाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या अनेक टोळ्या कोयता गँग म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

गुन्हेगारीचे आकर्षण आणि अमली पदार्थांचे सेवन

पुण्यातील छोट्या-मोठ्या उपनगरांतील अनेक मुले नशेच्या आहारी गेली आहेत. बहुतांश मुलांचे पालक कष्टकरी वर्गातील आहेत. यातील काही मुले भरकटल्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांशी जोडली गेली आहेत. अल्पवयातच गुन्हेगारी जगताशी संपर्क झाल्याने बेदरकारपणा या मुलांमध्ये भिनला आहे. भरधाव वेगाने दुचाकी चालविणे, भर रस्त्यात तलवार,कोयत्याने केक कापण्याच्या घटना उपनगरात घडत आहेत.

हेही वाचा : तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

पोलिसांचे हात कायद्याने बांधले?

अट्टल गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखवत पोलिसांनी गेल्या दोन वर्षात १०८ टोळ्यांमधील सुमारे पाचशेजणांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का ) आणि ८४ गुंडांविरुद्ध महाराष्ट्र गुन्हेगारी व विध्वसंक कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) पोलिसांनी कारवाई केली. मात्र, अल्पवयीन मुलांवर कारवाई करताना पोलिसांना नाईलाजाने हात आखडता घ्यावा लागत आहे.

कोयता गँगवर कारवाई कशी करणार?

कोयता उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. अल्पवयीन मुलांवर जरब बसविण्यासाठी बालगुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील सराईतांची झाडाझडती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिसांकडून मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. समुपदेशन आणि कारवाई अशी व्यूहरचना पोलिसांनी आखली आहे.

हेही वाचा : पुणे : कोयता गॅंगला चाप बसवण्यासाठी कोयते विक्रेत्यांवर कारवाई, बोहारीआळीतील दुकानदाराकडून १०५ कोयते जप्त

अधिकाऱ्याचे पाठबळ आवश्यक?

सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात २९ डिसेंबर रोजी दोन सराइतांनी कोयते उगारून खाद्यपदार्थ विक्री गाड्यांची मोडतोड केली. नागरिकांवर कोयते उगारुन दहशत माजविली. गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सराइतांना चोप दिल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसांना मर्यादा येतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. गुन्हेगारांना, विशेषत: अल्पवयीन गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढताना मानवी हक्कांचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेही अनेक वेळा पोलिसांना कारवाई करताना काळजी घ्यावी लागते.

वचक बसवण्यासाठी विशेष पथक?

पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गॅँगवर वचक बसविण्यासाठी विशेष पथक तयार केले जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात दिली. पोलीस महासंचालकांनी कोयता गँगचा दहशतीची गंभीर दखल घेतली असून कोयता गँगचा बिमोड करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : ‘कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांचे विशेष पथक नेमले’; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

कोयते येतात कोठून?

शेतीकामासाठी वापरले जाणारे कोयते कृषी अवजारांच्या दुकानांमध्ये, आठवडी बाजारांमध्ये सहजपणे उपलब्ध होतात. मंगळवार पेठेतील जुन्या बाजारामध्ये कोयत्यांची खुलेआम विक्री होते. ग्रामीण भागातील लोहारांचा कोयत्यांसह खुरपी, कुऱ्हाडी आणि अन्य साधने बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. बळीराजाच्या अवजारांचा वापर गु्न्हेगारी कृत्यासाठी करण्यात येत असल्याने आता पोलिसांनी कोयते विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे.

rahul.khaladkar@expressindia.com