Vaishnavi Hagawane पुण्यातल्या मुळशी या ठिकाणी राहणाऱ्या वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी झालेला छळ सहन न झाल्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. वैष्णवीने आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने शशांक हगवणेशी प्रेमविवाह केला होता. मात्र शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दरम्यान तिचं बाळ तिच्या माहेरी म्हणजेच तिच्या आई वडिलांकडे पोहचवण्यात आलं आहे. हे बाळ कुटुंबापर्यंत कसं पोहचलं हे वैष्णवीच्या काका आणि मामांनी सांगितलं आहे.

काय आहे वैष्णवीच्या आत्महत्येचं प्रकरण?

वैष्णवी कसपटे आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांचा विरोध असूनही वैष्णवीने सगळ्यांचा विरोध पत्करा होता आणि शशांकशी लग्न केलं. वैष्णवीच्या हट्टाखातर आई-वडिलांनी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. या लग्नात शशांकला ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी देण्यात आली होती. तसेच १ लाख २० हजारांचं घड्याळही देण्यात आलं होतं. चांदीच्या वस्तू देखील देण्यात आल्या होत्या. तरीही हगवणे कुटुंबियांची हाव संपली नाही. त्यांच्याकडून सातत्याने वैष्णवीला मारहाण करण्यात येत असे. सासरच्यांनी तिचा बराच छळ केला. त्यानंतर वैष्णवीने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. मात्र, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु आहे. वैष्णवीचा नवरा, तिची नणंद या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. तिचे सासरे आणि दीर फरार आहेत ज्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

वैष्णवीच्या काकांनी काय सांगितलं?

“आमचं बाळ आम्हाला मिळालं आहे. बाकी फार काही बोलणार नाही. आरोपी कसे पकडले जातील? हीच आमची मागणी आहे. वैष्णवीच्या बाळाबाबत एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेर येथील हायवेवर ते बाळ आमच्या ताब्यात दिलं. आम्ही बाळ आमच्या ताब्यात घेतलं आहे. आम्ही आता आनंदी आहोत. आमच्या ओळखीचा व्यक्ती नव्हता. त्याने आम्हाला फोन केला आणि बाळ आमच्याकडे दिलं. बाणेर हायवेला या असं त्याने सांगितलं ते निघून गेले. आम्हीही चौकशी केली नाही. तो व्यक्ती निघून गेला. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Vaishnavi Hagawane Death Case Latest Updates in Marathi
वैष्णवीच्या मोठ्या जावेचेही शशांक हगवणेवर गंभीर आरोप (फोटो – सोशल व्हायरल)

वैष्णवीच्या मामाने काय सांगितलं?

“आमचं बाळ सुखरुप आमच्या ताब्यात आम्हाला मिळालं. हगवणे कुटुंबाचा आणि कस्पटे कुटुंबाचा होता. तिऱ्हाईत व्यक्ती बाळ कसं काय सांभाळणार? बाळ आता आनंदात राहणार. एक गाडी आली आणि त्यांनी बाळाला आमच्याकडे सोपवलं त्यानंतर आम्ही घरी आलो. आता आमची मागणी हीच आहे की राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केली पाहिजे. पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत. ते लवकरच या दोघांना अटक करतील” असा विश्वास वैष्णवीच्या मामाने व्यक्त केला आहे.