केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. अर्थव्यवस्थेसंबंधी योजना असती तर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी १ जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचं आम्ही मानतो असं सांगितलं.

कोरेगाव भीमामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत जमावबंदी

पुढे ते म्हणाले की, “केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. कदाचित त्यांच्याकडे योजना असती तर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो. पण एकंदरीत लोकं काय निर्णय घेतला पाहिजे सांगत आहेत. पण शासन काय निर्णय घ्यायचा हे ठरवत नाहीये. दुर्दैवाने सरकार फक्त आदेश काढत आहेत”.

पाहा फोटो >> अजित पवारांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन; जनतेला केलं आवाहन

“मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरु व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असं दिसत आहे, करोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi prakash ambedkar koregaon bhima corona sgy
First published on: 01-01-2021 at 07:38 IST