पुणे : वसंत मोरे म्हणतात, मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर… | Vasant More has expressed his reaction regarding Chandni Chowk bridgepune print news amy 95 | Loksatta

पुणे : वसंत मोरे म्हणतात, मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर…

वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत असलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल शनिवारी रात्री नियंत्रित स्फोट करून जमीनदोस्त करण्यात आला.

पुणे : वसंत मोरे म्हणतात, मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर…
हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे

वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचा ठरत असलेला चांदणी चौकातील उड्डाणपूल स्फोट घडविल्यानंतरही संपूर्ण न पडल्यामुळे पुलाच्या मजबुतीकरणाचा मुद्दा पुढे आला असतनाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे यांनीही समाज माध्यमात त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला द्यावी तसेच रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रस्त्याच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी नक्की करेन, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> पुणे : दुचाकीवरुन प्रवासी वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याला धमकी

वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत असलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल शनिवारी रात्री नियंत्रित स्फोट करून जमीनदोस्त करण्यात आला. स्फोटानंतरही संपूर्ण पूल पडला नाही. पुलाचा काही भागच पडला. त्यामुळे पूल पाडण्यात अपयश आल्याची चर्चा सुरू असतानाच उड्डाणपुलाच्या मजबुतीकरणाचा प्रश्नही उपस्थित झाला. त्यासंदर्भात मनसेचे नेते वसंत मोरे यांनी देखील पुलाच्या मजबूतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.सहाशे किलो स्फोटके, १३५० खड्डे, पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी, गेल्या महिन्यापासून धावपळ, केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांची रेलचेल, प्रचंड मोठी यंत्रणा, तरीही पूल पूर्ण पाडू शकले नाहीत. यावरुन एक मात्र नक्की की पुलाचा ठेकेदार किती भारी असेल! भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी व रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करेन, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : कोट्यवधींच्या खर्चानंतरही स्वच्छ स्पर्धेतील मानांकनात घसरण

संबंधित बातम्या

Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
पुणे: कमी पटसंख्येच्या शाळा बंद नाही करण्यात येणार नाही; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची स्पष्टोक्ती
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा, अध्यक्षपदी विश्वास देवकाते
टेंभुर्णीच्या फळांसाठी ‘त्यां’नी तेंदुपत्त्यावर पाणी सोडले!
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला खिंडार; जिल्हा प्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Viral Video: हायवेवर चक्क ड्राइव्हरशिवाय १ किलोमीटर धावला कंटेनर अन्…
“…तेव्हा मी १८ तास जेवण केलं नव्हतं” ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील ‘तो’ प्रसंग सांगताना अनुपम खेर भावूक
शिवाजी महाराजांविषयी बोलताना भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान, म्हणाले “शिवरायांचा जन्म…”
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…
‘या’ सवयींमुळे वाढू शकतो मधुमेह होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध