पुणे : कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे नाट्यगृहात बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाट्यगृहात मागे भिंतीजवळ उभे राहून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ही ‘राजनिष्ठा’ प्रेक्षकांच्या नरजेतूनही सुटली नाही.

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी नेतृत्व कोण? राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ नेत्याचं घेतलं नाव, म्हणाले…

Umarkhed, Digras, Ralegaon, Sanjay Rathod,
उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Atul Save, chandrakant khaire
ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?
Raj Thackeray on Code of Conduct
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!
Raj Thackeray kalyan Rural
Raj Thackeray Speech : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…

अभिनेते अशोक सराफ यांच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव करण्यासाठी अशोक पर्व, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात अशोक सराफ यांचा सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्यामुळे नाट्यगृहात खचाखच भरले होते.

हेही वाचा >>> शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

या कार्यक्रमाला काहीसे उशीराने आलेले मनसे नेते वसंत मोरे यांनी मागे उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेणे पसंत केले. पण, मोरे मागे उभे राहिले आहेत, हे छायाचित्रकारांच्या नजरेतून सुटले नाही. कॅमेरे मागे वळताच सर्वांच्या नजरा वसंत मोरे यांच्यावर स्थिरावल्या. मात्र बसण्यासाठी जागा नसतानाही तासभर उभे राहून वसंत मोरे यांनी कार्यक्रमाला पूर्णवेळ हजेरी लावली.