आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट यांना यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : पिंपरी पालिकेत मानधनावरील शिक्षक भरतीसाठी ८५० जणांचे अर्ज

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने वत्सलबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात येते. ५१ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ प्रांगणात १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पं उपेंद्र भट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी संगितले.

हेही वाचा >>>पुणे: सदस्यपदासाठी ३०३३,तर सरपंचपदासाठी ५६० उमेदवार; जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक

यंदाच्या वर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. याच वर्षी वत्सलाबाई जोशी पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना पं. उपेंद्र भट यांनी व्यक्त केली. माझे गुरू पं. माधव गुडी यांच्यामुळे १९८० पासून पं. भीमसेन जोशी हयात असेपर्यंत त्यांच्याकडे संगीत शिकणे सुरू होते. माझ्या गुरूने सुरू केलेल्या महोत्सवात वत्सला आई यांच्या नावे माझा सन्मान जन्मशताब्दी वर्षांत होत आहे, हा माझा एकप्रकारे केलेला गौरव आहे, असेही भट यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vatsalabai joshi award announced to upendra bhat pune print news vvk 10 amy
First published on: 08-12-2022 at 19:44 IST