लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वडगाव शेरीत वार्षिक यात्रा सुरू असताना टोळक्याने मध्यरात्री वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविल्याची घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी रोपी सोमेश्वर पांचाळ, साहिल राठोड, बजरंग पाटोळे, स्वप्नील तुपसमिंद्रे, राज गायकवाड, शरद कांबळे, रोहित राठोड, अल्ताफ शेख, गणेश सलगर, कुणाल परिहार, ओमी, विठ्ठल, मनोज नवगिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रोहित धनाजी देसाई (वय २४, रा. योगेश्वर सोसायटी, कुरकुटे हॉस्पिटजवळ, वडगाव शेरी) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडगाव शेरीतील ग्रामदेवतेची दोन दिवस यात्रा होती. यात्रेत टोळके आरडाओरडा करत निघाले होते. त्या वेळी रस्त्याने आरडाओरडा करत निघालेल्या टोळक्याला ऋषीकेश पवळे यांनी हटकले. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास टोळके कुरकुटे हॉस्पिटलजवळील गल्लीत शिरले. त्यांच्याकडे दांडकी होती. शिवीगाळ करुन टोळक्याने वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोळक्याने दोन रिक्षा, तसेच दहा ते बारा दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीनंतर परिसरात घबराट उडाली. पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.