अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या विनय अऱ्हानासह तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. भूषण अनिल पाटील (वय ३४), अभिषेक विलास बलकवडे (वय ३१, रा. दोघेही नाशिक) आणि विनय विवेक अऱ्हाना (वय ५०) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमली पदार्थ तस्करी आणि ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातून ललित पाटील फरार झाल्याप्रकरणी गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केलेल्या विनय अऱ्हाना याला बुधवारी तळोजा कारागृहामधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यापूर्वी दत्तात्रय डोके आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे: मोटारीचा धक्का लागून दुचाकीवरील दोघे पडले… विचारपूस सुरू असताना दोघांनी मोटारच पळवून नेली

ललित पाटील हा ससून रुग्णालयाच्या वार्ड क्र १६ मध्ये उपचार घेत असताना भूषण पाटीलने २९ सप्टेंबर रोजी, तर अभिषेक बलकवडे याने ३० सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. या दोघांनी कट रचून ललित पाटीलला पळविले असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना विनय अऱ्हाना याच्याशी त्याची ओळख झाली होती. दि. २ ऑक्टोबर रोजी ललित पाटील पळून गेला. त्याला पळून जाण्यासाठी विनय अऱ्हानाकडे काम करणारा चालक दत्तात्रय डोके याने गाडी उपलब्ध करून दिली. तसेच अऱ्हानाचा व्यवस्थापक अश्विन कामत याने ललित पाटीलला एटीएम दिले.

विनय अऱ्हाना याने कोणत्या कारणांसाठी ललित पाटीलची मदत केली आहे? कोणाच्या सांगण्यावरून ही मदत केली आहे? अटक करण्यात आलेल्या आरोपींनी संगनमत करून कशा प्रकारे आणि कुठे कट रचला आहे याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.

हेही वाचा >>> पुण्यात पिझ्झा मिळण्यासाठी झाला उशीर, संतापलेल्या व्यावसायिकाचा गोळीबार; डिलिव्हरी बॉयला माराहाण

आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. विनय अऱ्हाना यांच्या वतीने भाग्यश्री सोतूर यांनी बाजू मांडताना सांगितले की, विनय अऱ्हाना हे न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयीन कोठडीत असताना ते चालक आणि व्यवस्थापकाला ललित पाटीलची मदत करा हे कसे काय सांगू शकतात. तसेच ललित पाटील पळून गेल्यानंतरही अऱ्हाना हे पुढचे चार दिवस ससून रुग्णालयात वार्ड क्र १६ मध्ये होते. त्या वेळी पोलिसांनी का चौकशी केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. तर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या वतीने संदीप बाली यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून न्यायालायने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.           

भूषण पाटील याला न्यायालयात भोवळ

भूषण पाटील याला गुरुवारी न्यायालयात बुरखा घालून न्यायालयात दुपारी तीन वाजता हजर करण्यात आले. या वेळी आरोपी भूषण पाटील याला भोवळ आली. त्यामुळे तो टेबलावरून खाली पडला. यानंतर त्याला कोर्ट रूमच्या बाहेर नेण्यात आले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinay aranha including three others get police custody for helping lalit patil to escape pune print news vvk 10 zws
First published on: 26-10-2023 at 22:38 IST