पुणे : युवक मतदारांची निवडणूक प्रक्रिया, मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी घरोघरी जाऊन आणि पालकसभेत पालकांना आवाहन करणार आहेत. विद्यार्थ्यांना मतदान केंद्र व्यवस्थापन, रांगा लावणे या कामांत स्वयंसेवक म्हणून मदत घेतली जाणार आहे. तसेच युवक-युवतींकडे पुणे जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार आहे. त्यात पुणे, बारामती, शिरूर या तीन मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर मावळ मतदारसंघात तीन युवक व्यवस्थापित मतदान केंद्रे असणार आहेत. या मतदान केंद्रांची यादी जिल्हा निवडणूक शाखेने जाहीर केली.

हेही वाचा >>> पाणी चोरी, प्रदूषण… ‘जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस का बजावली?

challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

ग्रामीण भागात जुन्नरमध्ये ज्ञानमंदिर हायस्कूल आळे, आंबेगावमध्ये जिल्हा परिषद शाळा लखेवाडी, खेड-आळंदीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण, शिरूरमध्ये विद्याधाम प्रशाला घोडनदी, दौंडमध्ये सेठ ज्योती प्राथमिक शाळा, इंदापुरात श्री नारायणदास रामदास हायस्कूल, बारामतीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळद, पुरंदरमध्ये जिल्हा परिषद शाळा जुनी जेजुरी, भोरमध्ये ब्लू रिज पब्लिक स्कूल हिंजवडी आणि मावळात रमेश कुमार सहानी विद्यालय वडगाव मावळ या ठिकाणी युवक व्यवस्थापित मतदान केंद्रे असणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवडमध्ये बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवी सांगवी, पिंपरीत मंघनमल उधाराम कॉमर्स कॉलेज आणि भोसरीमध्ये मॉडर्न हायस्कूल निगडी या ठिकाणी युवक व्यवस्थापित मतदान केंद्रे निश्चित केली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.

हेही वाचा >>> खुषखबर… मुद्रांक अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मुदतवाढ

पुण्यातील युवक संचालित मतदान केंद्रे

वडगाव शेरी – इऑन ग्यानांकुर शाळा, तळमजला खोली क्र. एक, खराडी

शिवाजीनगर – सिम्बॉयसिस कॉलेज, खोली खोली क्र. १०१

कोथरूड – एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, सरस्वती विश्व, पौड रस्ता, कोथरूड (वाहनतळ परिसर, तात्पुरती रचना)

खडकवासला – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहुली, दक्षिणाभिमुख इमारत पश्चिमेकडील खोली क्र. एक

पर्वती – प्रगती विद्यालय आनंदनगर, हिंगणे खुर्द

हडपसर – सेंट पेट्रिक टाऊन सो. नवीन कार्यालय इमारत खेळ मैदान ऑफिस पूर्व विभाग खोली क्र. दोन

पुणे कॅन्टोन्मेंट – नौरोसजी वाडिया कॉलेज कसबा पेठ – स. प. महाविद्यालय मुख्य इमारत, खोली क्र. एम-१५, सदाशिव पेठ