पुणे : तावरे चौक येथे दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडणी विषयक कामे करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी दक्षिण पुण्याच्या काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरठा विभागाकडून देण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरठा होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तावरे काॅलनी, वाळवेकर नगर, सातारा रस्ता, इलेक्ट्राॅनिक इस्टेट, पर्वती इंडस्ट्रिअल इस्टेट, ट्रेझर पार्क, अण्णाभाऊ साठे वसाहत, संतनगर, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, शिवदर्शन, अरणेश्वर, महर्षीनगर, आदर्शनगर, मुकुंदनगरचा काही भाग, प्रेमनगरचा काही भाग, गुलटेकडी, मार्केटयार्डच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.