पुण्यासह राज्याच्या विविध भागांत सोमवारी पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे या आठवड्यात उन्हाचा चटका कमी राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या २४ तासांत दक्षिण तमिळनाडू व लगतचा भाग ते दक्षिण कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि के रळ या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवेच्या दिशेतील बदलामुळे, तसेच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस होत असल्याचे हवामान विभागाने जाहीर के ले आहे. त्यामुळे राज्यात सोमवारी काही ठिकाणी पाऊस पडला. पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, लातूर, सोलापूर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, नगर आणि औरंगाबाद जिल्ह््यात काही ठिकाणी सोमवारी दुपारनंतर ढग दाटून आले होते.

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह््यात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पुणे, नगर, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, सोलापूरचा ग्रामीण भाग, वाशिम, कोकणासह विविध भागांत पावसाने हजेरी लावली.

अंदाज काय?

बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आणि गुरुवारी संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weather department forecasts rain for the next two days in the state abn
First published on: 13-04-2021 at 00:59 IST