विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शिवसेना नेत्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पुणे इथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, त्यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपाला लक्ष्य करतांना राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

“मागील लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे,त्यातून कोणाची बदनामी केलीकोणाचा व्हिडिओ लावला, भोंगे त्याबाबत काय झालं? त्यामुळे कोण ते ठाकरे, त्या ठाकरेंचं महत्त्व काय,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना सांगितलं, ते उद्धवजी ठाकरे,आदित्यजी ठाकरे आहेत. बाकीचे असतील माहिती नाहीत” अशा शब्दात दानवे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई महापालिकेत १५० जागा निवडून आणण्याचं लक्ष्य भाजापाने ठेवलं आहे. त्यावर अंबादास दानवे म्हणाले की मागील निवडणुकीत देखील अशीच घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचा करिष्मा होता.तसेच तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.आता ते उपमुख्यमंत्री आहेत.काही होणार नसून शिवसेना केवळ निवडणुका आल्या की काम करीत नाही तर ३६५ दिवस शिवसैनिक काम करीत असतो.त्यामुळे शिवसेनाचा विजय कोणीही थांबू शकत नाहीअशा शब्दात दानवे यांनी भाजपावर टीका केली आहे.

भाजपच्या येथील नेतृत्वामध्ये शक्ती नाही का ? करिष्मा नाही का ? ती ताकद नाही का?असा सवाल अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत उपस्थित करीत भाजपाच्या राज्यातील नेत्यावर विरधीपक्षनेत्यांनी निशाणा साधला. भाजपाबद्दल देशातील जनते मध्ये प्रचंड चीड आणि नाराजी आहे. आगामी काळात होणार्‍या निवडणुकीत जनता मतदानाच्या माध्यमामधुन भाजपला त्यांची निश्चित जागा दाखवेल अशा शब्दात भाजपवर त्यांनी टीका केली.

तेतज ठाकरे राजकारणात सक्रिय होण्याच्या चर्चेचे जोरदार समर्थन शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. “आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे हे अनेक कार्यक्रमात सहभागी होतात, भाषण देखील करतात. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांनी तलवार देऊन आशिर्वाद दिले होते.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आणि स्वतःला वाटेल तेव्हा ते राजकारणात सक्रीय होतील. ही घराणेशाही नाही, हा कामाचा आणि सेवेचा वारसा आहे. त्यामधून लोकांना आधार मिळत असेल तर त्यात काही चुकीचे नाही. १८ ते २१ वयोगटातील जो तरुण राजकारणाबद्दल उदासीन आणि नैराश्यात होता, तो तरुण वर्ग आदित्य ठाकरे आल्यावर अधिक सक्रीय झाला. सध्या तेजस यांच शिक्षण सुरू आहे. राजकारणात सक्रिय होण्याबाबत सर्व कुटुंबिय मिळून निर्णय घेतील” असं मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.