पुणे: राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊन जवळपास सात महिन्याचा कालावधी होत आला आहे.तरी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.तर रायगड जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची कन्या मंत्री अदिती तटकरे आहेत.तर दुसर्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले हे आहेत.तर मागील सात महिन्याच्या कालावधीत सुनील तटकरे आणि भरतशेठ गोगावले या दोन्ही नेत्याकडून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून दावा करण्यात आला आहे.त्या दरम्यान दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.
भरत शेठ गोगावले हे पुणे दौर्यावर आले होते.त्यावेळी त्यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले,आम्ही रायगडचे मावळे आहोत,आम्ही शांत होण्याच काहीच कारण नाही.संयमाने चालण गरजच आहे. त्याप्रमाणे आम्ही चाललो आहोत,आम्हाला विश्वास आहे की,आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चित निर्णय घेतील,काही गोष्टी सबुरीनी घ्याव्या लागतात.श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचे शब्द असून त्या मार्गाने आम्ही चाललो आहोत,त्यामुळे रायगडवासी यांचे स्वप्न पूर्ण अशी भूमिका त्यांनी मांडली.