कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान सकाळपासून सुरू झाले आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवर व्यवस्था केली आहे. त्यामुळे चालण्यास अडचण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व्हिलचेअरची सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा- ‘मुक्ताताईंची उणीव भासली’; मतदानानंतर शैलेश टिळक भावूक

low turnout in Phase 1 of Lok Sabha Elections 2024
मतटक्का घसरला, आयोगाला चिंता, पहिल्या टप्प्यातच कमी मतदान; पुढील टप्प्यांत टक्केवारी वाढविण्याचे आव्हान
Kashmiri voters form m (1)
काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
Rsmssb Recruitment 2024
सरकारी नोकरी करण्याची ‘ही’ शेवटची संधी, ‘या’ विभागात ६७९ पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणाऱ्या मतदारांसाठी किमान १३ आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश आहेत. त्यात मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, डॉक्टरांच्या संघटनांच्या सहकार्यातून दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा आदींचा त्यात समावेश असतो. कसबा मतदारसंघातील गोगटे प्रशाला मतदान केंद्रासह विविध मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांकडून या सुविधेचा वापर करण्यात आहे. त्यामुळे या सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे.