मद्यपी पतीकडून पत्नीचा खून  मेहुणीवर चाकूने वार ;  हडपसर भागातील घटना

या घटनेत मेहुणी जखमी झाली असून मद्यपी पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली.

woman murder in pune
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : मद्यपी पतीने पत्नीवर चाकुने वार करुन तिचा खून केल्याची घटना हडपसर भागातील साडेसतरा नळी परिसरात घडली. मध्यस्थी करणाऱ्या मेहुणीवर त्याने वार केले. या घटनेत मेहुणी जखमी झाली असून मद्यपी पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली.

नंदिनी हनुमंत पवार (वय १९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती हनुमंत धोंडिबा पवार (वय २४, रा. सूर्यवंशी बिल्डींग, साडेसतरा नळी, हडपसर) याला अटक करण्यात आली. पवार याने भांडणात मध्यस्थी करणारी मेहुणी कोमल वैजनाथ लांडगे (वय २२) हिच्यावर चाकूने वार केले. याबाबत नंदिनीची आई माणिका शिवाजी कांबळे (वय ५५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हनुमंत याचा नंदिनीशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. मुलीचा सांभाळ करण्यासाठी मेहुणी कोमल त्यांच्याकडे राहत होती. हनुमंत मजुरी करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. हनुमंत दारू पिऊन घरी आला आणि त्याने पत्नी नंदिनीला पट्ट्याने मारहाण केली. या घटनेची माहिती नंदिनीने आई माणिका यांना दिली. आईकडे माझी तक्रार करते का, असे म्हणून हनुमंतने तिच्यावर चाकुने वार करण्यास सुरुवात केली. मेहुणी कोमलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने मेहुणीवर चाकुने वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी घटनास्थळी देऊन तातडीने तपास सुरू केला. आरोपी हनुमंतला अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wife stabbed to death by drunken husband in pune hadapsar area pune print news zws

Next Story
अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी