पुणे : मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या मुलास बरे करण्याचे आमिष, तसेच जादुटोण्याची भीती घालून एका महिलेकडून ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. जादुटोण्याच्या भीतीमुळे महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबाचा सर्वनाश होईल, अशी भीती दाखवून महिलेकडे आणखी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

चारुदत्त संजय मारणे (वय ३१,रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव), पूनम घनश्याम कोहंडे (वय ३८), नीलम राहुल जाधव (वय ३५, रा. कर्वेनगर), देविका अमित जुन्नरकर (वय ३०, रा. उत्सव मंगल कार्यालयामागे, कोथरुड), संतोष मारुती येनपुरे (वय ४५, रा. गणेशपुरी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

woman disturbance court Mumbai, woman disturbance session court,
मुंबई : सत्र न्यायालयात गोंधळ घालणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल, आरोपी महिला मनोरुग्ण असण्याची शक्यता
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
nashik district court Rahul Gandhi
राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने उपस्थित राहण्याचा हुकूम देण्याचे कारण…
fraud with woman, pretending to be clerk,
मंत्रालयात लिपिक असल्याच्या बतावणीने महिलेची २० लाखांची फसवणूक
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित
court hammer pixabay
अटकेतील आरोपीचा न्यायालयालाच गंडवण्याचा प्रयत्न; न्यायमूर्ती संतापून म्हणाल्या, “याच्यावर तातडीने…”
Cheating with farmers by luring tractors on subsidy crimes against suspects in two police stations
अनुदानावर ट्रॅक्टरचे आमिष दाखवून शेतकऱ्याची फसवणूक, संशयिताविरुध्द दोन पोलीस ठाण्यात गुन्हे

याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला चंदननगर भागात राहायला आहे. महिलेचा मुलगा मानसिक विकाराने ग्रस्त आहे. कौटुंबिक अडचणी सोडविणे, तसेच मुलाला मानसिक विकारातून बरे करण्याचे आमिष आराेपींनी दाखविले. त्यासाठी काही विधी करावे लागतील, असे आरोपींनी सांगितले. आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी ३५ लाख रुपये उकळले.

हेही वाचा : स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आणि….

त्यानंतर आरोपींनी महिलेला नरबळी द्यावा लागेल, असे सांगून आणखी ५० लाख रुपये देण्याची मागणी केली. नरबळी न दिल्यास कुटुंबाचा सर्वनाश होईल, तसेच मुलगा आणि पतीचा मृत्यू होईल, अशी भीती आरोपींनी घातली. आरोपींनी जादुटोण्याची भीती दाखविल्याने महिला घाबरली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे तपास करत आहेत.