खडकवासला धरणात महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याची शक्यता पोालिसांनी व्यक्त केली आहे.सारिका संदीपान वाकुरे (वय २९, रा. एकता काॅलनी, उत्तमनगर, मूळ रा. हिंगजळवाडी, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. खडकवासला धरण परिसरात चौपाटीजवळ पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती विक्रेत्यांनी बुधवारी सकाळी हवेली पोलिसांना दिली. त्यानंतर हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अशोक तारू, महेश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : पुण्यात येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये भांडण; पोलीस हवालदारालाही मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा काही अंतरावर पंप हाऊसजवळ पिशवी सापडली. पिशवीत सारिका वाकुरे यांचे ओळखपत्र सापडले. पिशवीत ठेवलेल्या एका चिठ्ठीत लिहून ठेवलेल्या मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला. नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. वाकुरे यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.