महिलेवर बलात्कार प्रकरणी ज्येष्ठ वकिलावर गुन्हा

महिलेला आमिष दाखवून एका ज्येष्ठ वकिलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महिलेवर बलात्कार प्रकरणी ज्येष्ठ वकिलावर गुन्हा
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : महिलेला आमिष दाखवून एका ज्येष्ठ वकिलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वकिलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ॲड. वसंत धडकू पाटील (वय ७५, रा. गोदरेज रोझवूड सोसायटी, शिवाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांची महिलेशी ओळख होती. ॲड. पाटील यांनी महिलेच्या नावावर सदनिका करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी तिला देण्यात आली. पतीकडे तक्रार करतो, अशी धमकी देऊन ॲड. पाटील यांनी महिलेवर बलात्कार केला. ॲड. पाटील यांच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : कारागृहातून सुटताच कारागृह रक्षक महिलेला चोरट्याचा गंडा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी