लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भंगार मालाच्या दुकानात जुन्या फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन कामगाराचा मृत्यू झाल्यचाी धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. स्फोटात भंगार मालाच्या दुकानाच्या मालकासह तिघे जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणली.

महंमद शेख (वय ४९) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. भंगार माल खरेदी करणाऱ्या दुकानाचे मालक महंमद सय्यद यांच्यासह किशोर साळवे आणि दिलीप मिसाळ अशी जखम झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद मुंढवा पोलीस ठाण्यात करणअयात आली आहे. स्फोट नेमका कसा झाला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात नवशा गणपती मंदिराच्या परिसरात भंगार मालाचे मोठे दुकान आहे. भंगारात जुने फ्रिज आले होते. फ्रिज उघडून त्याचे भाग काढण्यात येत होते. कामगार महंमद शेख हे फ्रिजमधील कॉम्प्रेसर काढत होते. त्यावेळी भंगार माल दुकानाचे मालक महंमद सय्यद, कामगार किशोर साळवे, दिलीप मिसाळ तेथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कॉम्प्रेसरमधील गॅसचा अचानक स्फोट झाला. स्फोटात शेख गंभीर जखमी झाले. स्फोटामुळे परिसर हादरला. तेथे थांबलेले सय्यद, साळवे, मिसाळ यांना दुखापत झाली.

आणखी वाचा-‘राजगुरूनगर’प्रकरणी आरोपीला कोठडी, ग्रामस्थांकडून बंद; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सय्यद, साळवे, मिसाळ यांना किरकोळ दुखापत झाली, अशी माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांनी दिली. स्फोट नेमका कसा झाला, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.