लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : चोरी करण्यासाठी चोरटे नवनवीन शक्कल लढवित असतात. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी १७ लाख ५१ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी गोदामात चोरी करण्यासाठी छोटे भुयार तयार केले. भुयारातून आत शिरुन चोरट्यांनी तांब्याच्या तारा चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत संदीप गुरव (वय ५०) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात गुरव यांची अँग्रीको एनर्जी रेंटल इंडिया प्रा. लि. कंपनी आहे. तांब्याच्या तारा, तसेच अन्य इलेक्ट्रीकल्स साहित्याची कंपनीत निर्मिती केली जाते. कंपनीच्या चारही बाजूने मोठे पत्रे लावण्यात आले आहेत. चोरट्यांनी मध्यरात्री पत्र्याच्या शेडच्या परिसरातील माती उकरुन आत जाण्यासाठी छोटे भुयार तयार केले.

आणखी वाचा-अखेर महाविकास आघाडीतील तिढा सुटला; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून चिंचवडमधून राहुल कलाटे तर भोसरीतून अजित गव्हाणे यांना उमेदवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्र्याचे नट उचकटून आत प्रवेश केला. कंपनीच्या आवारातील १७ लाख ५१ हजार रुपयांचे ७३ तांब्याच्या तारांचे बंडल चोरुन नेले. सकाळी तांब्याच्या तारा चोरण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम तपास करत आहेत.