चंदननगर परिसरात तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली. अक्षय भिसे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्वैमनस्यातून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसानी दिली. अक्षय चंदननगर परिसरात मंदिरा जवळ थांबला होता. त्यावेळी त्याचावरा दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केला.

हेही वाचा – पुणे : व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची ४४ लाखांची फसवणूक ; तिघांच्या विरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारपुवी तो मरण पावला होता. दोन दिवसापूर्वी सिंहगड रस्त्यावर दहीहंडीच्या दिवशी एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता.