30 March 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : शिंपल्या फ्राय

बेसन, हळद, ओवा आणि मीठ एकत्र करून भज्याच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवावे.

शिंपल्या फ्राय

दीपा पाटील

साहित्य

शिंपल्या, अर्धी वाटी बेसन, ओला नारळ, मिरची, लसूण, कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा ओवा, चवीपुरते मीठ.

कृती

शिंपल्या उकडून त्याचा रिकामा भाग काढून घ्या. नारळ, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ घालून वाटून चटणी करा. आता ही चटणी गर असलेल्या शिंपलीवर लावून घ्या. बेसन, हळद, ओवा आणि मीठ एकत्र करून भज्याच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवावे. पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. आता चटणी भरलेल्या शिंपल्या बेसनाच्या या मिश्रणात घोळून शॅलो फ्राय करावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2019 1:22 am

Web Title: fried shell recipes
Next Stories
1 सेल्फीस  कारण की..
2 थंडीतील आजार
3 दमा
Just Now!
X