Bundi Raita : दही हे लहानापासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आवडते. तुम्ही अनेकदा वेगवेगळया पदार्थांबरोबर दही खात असाल पण सध्या हिवाळा सुरू आहे. काही लोक सर्दी खोकल्यामुळे दही खाणे टाळतात. जर तुम्हाला दही खायला खूप आवडत असेल तर तुम्ही बुंदी रायते बनवू शकता. बुंदी रायता हा बेसनापासून बनवलेली बुंदी आणि दही पासून बनवला जाणारा पदार्थ आहे. फक्त दही खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही बुंदीचे रायते हा चांगला पर्याय आहे. बुंदीचे रायते तुम्ही सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण केव्हाही खाऊ शकता. जेवणाचा स्वाद वाढवणारा हा पदार्थ आहे. या शिवाय बुंदीचे रायते हा अत्यंत पौष्टिक आणि चवीला स्वादिष्ट आहे. फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही हे बुंदीचे रायते बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे रायते कसे बनवतात? तर अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला हा खालील रेसिपी नोट करावी लागेल. चला तर सविस्तर जाणून घेऊ या..

साहित्य

  • दही
  • बेसन
  • लाल मिरची पावडर
  • मीठ
  • तेल
  • तूप
  • वाटलेले जिरे
  • चाट मसाला
  • गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबिर

हेही वाचा : God Bhakari : पालकांनो, मुलांसाठी बनवा पौष्टिक गोड भाकरी; लगेच रेसिपी नोट करा

कृती

  • सुरुवातीला एका भांड्यात बेसन घ्या.
  • बेसनमध्ये लाल मिरची पावडर टाका
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • त्यात थोडे पाणी घालून लापशी बनवून घ्या.
  • ही लापशी चाळणीत टाका
  • आणि त्याची छोटी छोटी बुंदी तेलातून तळून घ्या
  • तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेला ऐवजी तुपातून तळून घेऊ शकता.
  • बुंदी तळून झाल्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवा
  • तोवर दही घुसळून घ्या.
  • घुसळलेल्या दह्यात थंड झालेली बुंदी टाका
  • त्यावरून वाटलेले जिरे, लाल मिरची, चाट मसाला, गरम मसाला त्यावर टाका
  • शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबिर टाका
  • बुंदीचे रायते तयार होणार.
  • हे बुंदीचे रायते फ्रिजमध्ये ठेवा
  • जेवताना बुंदीचे रायते सर्व्ह करा.
  • हे बुंदीचे रायते तुम्हाला आंबट वाटणार नाही.