scorecardresearch

Premium

पितृपक्ष नैवद्य थाळीसाठी चणा डाळीचे वडे करताय? असे बनवा स्वादिष्ट वडे, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

आज आम्ही तुम्हाला चणा डाळीचे वडे कसे बनवायचे, हे सांगणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या

chana Dal Vada Recipe
पितृपक्ष नैवद्य थाळीसाठी चणा डाळीचे वडे (Photo : YouTube)

chana Dal Vada Recipe : सध्या पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षात पितरांची पुजा केली जाते. त्यांना नैवद्य दाखवला जातो. पितरांच्या नैवद्य थाळीमध्ये अनेक पदार्थ बनवले जातात. चणा डाळीच्या वड्यांना सुद्धा या थाळीमध्ये विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला चणा डाळीचे वडे कसे बनवायचे, हे सांगणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

 • चणा डाळ
 • लसूण
 • हिरव्या मिरच्या
 • बारीक चिरलेला कांदा
 • जिरे
 • हिंग
 • हिंग
 • हळद
 • लाल तिखट
 • धनेपुड
 • बारीक चिरलेला कडीपत्ता
 • कोथिंबीर
 • तेल
 • मीठ

हेही वाचा : पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी कढी करताय? अशी बनवा चटपटीत कढी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

Coriander Farming
घरी कोथिंबीर कशी लावायची? जाणून घ्या लागवडीची ही सोपी पद्धत
Video Jugaad Use Make Knife Scissors Sharp While Using Bartan Manjhane Ka Scrub Saving Money with Masters Kitchen Hacks
भांडी घासायचा काथ्या सूरी व कात्रीला करेल क्षणात धारदार! काळजीपूर्वक वापरा हा जुगाड, पाहा Video
habits to stay fit without dieting and exercise
नेहमी तंदुरुस्त राहायचे असेल तर स्वत:ला ‘या’ ५ सवयी लावा; नेहमी राहाल निरोगी
Video Jugaad To Clean Diya Tamhan Brass Copper With besan Kokum Dahi Tambyachi Bhandi Cleaning Tips Save Money
१ वाटी बेसन, दह्यासह ‘हा’ पदार्थ वापरून तांब्याची भांडी करा लख्ख; दिवा, ताम्हण घासायचे कष्टच नाही, Video पाहा

कृती

 • चणा डाळ स्वच्छ पाण्यात चार ते पाच तास भिजवून घ्या
 • त्यानंतर त्यातील पाणी काढून या डाळीमध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घाला.
 • हे मिश्रण मिक्सरमधून जाडसर बारीक करावे.
 • बारीक केलेल्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा, जिरे, हिंग, हळद लाल तिखट, धनेपुड, बारीक चिरलेला कडीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकावे.
 • हे मिश्रण चांगले एकजीव करावे.
 • या मिश्रणाचे वडे हातावर थापावे.
 • त्यानंतर गरम तेलातून मंद आचेवर हे वडे तळून घ्यावे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chana dal vada recipe how to make chana dal vada for pitru paksha food thali ndj

First published on: 03-10-2023 at 14:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×