सध्याच्या काळात पुरूषासोबतच घरांतील स्त्री देखील वर्किंग वुमन बनली आहे. ती देखील तितक्याच जिद्दीने व हिंमतीने पैसे कमविण्यासाठी, स्वतःचे करियर घडवण्यासाठी घराबाहेर पडते. अशा परिस्थिती घर आणि ऑफिस सांभाळताना तिची तारेवरची कसरत होते खरी. परंतु घरांतील स्त्री या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय लिलया पेलून नेते. काही वर्किंग वुमन घरातील इतर काम पाहण्यासाठी कामवाली बाई ठेवतात किंवा काही महिला स्वतःच सगळी काम करतात. एकाच वेळी घरांतील काम, स्वयंपाक बनवणे, मुलांकडे लक्ष देणे, ऑफिसचे टार्गेट पूर्ण करणे अशा हजारो कामांचे ओझे तिच्या डोक्यावर असते. त्यात घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे आवडते जेवण बनवायचे म्हणजे तिची पळता भुई थोडी होते. परंतु जर आपण स्वयंपाक घरातील थोडी कामे आधीच करुन ठेवली तर आयत्या वेळी घाई गडबड न होता स्वयंपाक चटकन बनवून होतो. अशीच एक रेसिपी जी आदल्या दिवशी बनवून तुम्ही ठेवू शकता. होय, सँडविच एक दिवस आधी बनवून ठेवता येतात. सँडविच बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या ब्रेड, टोमॅटो, चटणी, मेयोनीज यांसारख्या पदार्थांचे स्टॉक ठेवून, सँडविच एकत्र करून ठेवता येतात. सँडविच बनवण्यासाठी फॉइल किंवा प्लास्टिकचा वापर करून त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते

  • क्रीम चीज सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  • क्रीम चीज स्प्रेड
  • काळी मिरपूड
  • चिली फ्लेक्स
  • पिझ्झा सिझनिंग / मिक्सड हर्ब्स
  • ८~१० किसलेल्या लसूण पाकळ्या
  • बारीक चिरलेली पिवळी शिमला मिरची
  • बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची
  • बारीक चिरलेली लाल शिमला मिरची
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ब्लॅक ऑलिव्ह

कृती

  • सर्वात आधी क्रीम चीज स्प्रेड घ्या त्यामध्ये काळी मिरपूड, चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझनिंग / मिक्सड हर्ब्स, ८~१० किसलेल्या लसूण पाकळ्या हे सगळं एकजीव करुन घ्या.
  • आता त्यामध्ये बारीक चिरलेली पिवळी शिमला मिरची, बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची, बारीक चिरलेली लाल शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करा.
  • आता हे मिश्रण ब्रेडवर पसरवून घ्या, त्यावर दुसरा ब्रेड ठेवा, ब्रेडच्या स्लाइसवर टोमॅटो सॉस लावा. वरुन ब्लॅक ऑलिव्हने गार्निश करा. अशा प्रकारे झटपट आपलं सँडविच तयार आहे.

आठवड्याभराचे मेन्यू प्लॅनिंग – जे पदार्थ येत्या आठवड्यात बनवायचे असतील त्याच प्लॅनिंग विकेंडलाच करुन घ्यावे. हे प्लॅनिंग झाल्यानंतर ते पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची एक यादी तयार करावी. विकेंडला सामानाची खरेदी करताना या लागणाऱ्या सर्व वस्तूंची एकदाच खरेदी करावी. यामुळे आपल्या डोक्यात आठवड्याभराचा मेन्यू लक्षात राहील आणि आपल्याकडे आवश्यक सामानही घरातच उपलब्ध असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाज्या कापून, सोलून, निवडून ठेवाव्यात – सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत भाज्या कापण्यात व सोलण्यात सर्वात जास्त वेळ लागतो. विकेंडला आपण ही देखील कामं करून ठेऊ शकता. उदाहरणार्थ :- मटार सोलून हवाबंद डब्यात ठेवणे, कोंथिबीर व पुदीना मोकळा वेळ मिळाल्यावर निवडून फ्रिजमध्ये स्टोर करणे