Crispy Chilli Garlic Bites Recipe: सकाळचा आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावं हा प्रश्न नेहमी सगळ्यांना पडत असतो. काहीतरी चविष्ट अशी रेसिपी जी लहान मुलांनाही तितकीच आवडेल असं करण्याच्या प्रयत्नात घरातली करती स्त्री असते. पण नेहमीच ते शक्य होत नाही. नवीन रेसिपी आणणार तरी कुठून मग रोज तेच तेच करून आपण खातो. पण आज आपण एक अशी चवदार रेसिपी जाणून घेणार आहोत जी खाऊन तुमच्या मुलांसह तुम्हीही व्हाल खुश. चला तर मग जाणून घेऊयात क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्सची रेसिपी.

हेही वाचा… Kadha Recipe: तुम्हालाही सर्दी, खोकला झालाय? आजीच्या बटव्यातील हा खास काढा पळवेल तुमचा आजार दूर, वाचा साहित्य आणि कृती

साहित्य

दोन उकडलेले बटाटे

१ टेबलस्पून चिली फ्लेक्स

१ टेबलस्पून ओरेगॅनो

१ टेबलस्पून टेबल सॉल्ट

१ टेबलस्पून लाल मिरची पूड

२ ते ३ बारीक चिरलेली लसूण

२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर

कोथिंबीर

टोमॅटो सॉस

हेही वाचा… Soyabean Bhurji Recipe: ‘सोयाबीन भुर्जी’ एकदा ट्राय कराच! रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

रेसिपी

  1. दोन उकडलेले बटाटे घ्या.
  2. त्यात १ टेबलस्पून चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घाला.
  3. १ टेबलस्पून टेबल सॉल्ट आणि १ टेबलस्पून लाल मिरची पूड घाला.
  4. २ ते ३ बारीक चिरलेली लसूण घाला.
  5. २ टेबलस्पून कॉर्नफ्लोर घाला.
  6. कोथिंबीरचा समावेश करा.
  7. सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
  8. एक छोटी तुकडी घेऊन त्याला गोल आकार द्या.
  9. प्रत्येक चिली गार्लिक बाईटला मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
  10. ताजे गरम करून त्यांना केचप किंवा सॉससोबत सर्व करा.
View this post on Instagram

A post shared by Mansi Chaudhary (@khana_peena_recipe)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.