Crispy Corn Recipe: अनेकदा काहीतरी चटपटीत खावसं वाटतं म्हणून आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो. स्नॅक्स टाईम झाला की वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्याची इच्छा होते. घरीच काहीतरी चांगलं बनवायचा विचार केला तर खूप वेळही जातो आणि अनेकदा आपणच कंटाळा करतो. पण अवघ्या १० मिनिटांत तुम्ही घरच्या घरी एक असा पदार्थ बनवू शकतो ज्याने तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. त्याचं नाव म्हणजे, ‘क्रिस्पी कॉर्न’.

अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मका आवडतो. आपण अनेकदा उकडलेला मका, भाजलेला मका सगळ्यांना आवडतो. आज आपण ‘क्रिस्पी कॉर्न’ची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

मका

२ चमचे कॉर्नफ्लोर

आलं

लसूण

१ किंवा २ हिरव्या मिरच्या

कांदा

१/२ चमचा लाल मिरची पूड

मीठ

१ चमचा धणे पूड

कोथिंबीर

हेही वाचा… संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ‘चीज बॉल्स’, लहान मुलंही होतील खुश; वाचा सोपी रेसिपी

कृती

  1. एक वाटी मका उकडून घ्या.
  2. उकडून कोरडे केल्यानंतर त्यात २ चमचे कॉर्नफ्लोर घाला.
  3. मध्यम ते गरम आचेवर त्यांना डीप फ्राय करा.
  4. एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात बारीक कापलेलं आलं, लसूण, १ किंवा २ हिरव्या मिरच्या आणि कांदा टाका.
  5. हे सगळं छान परतून त्यात १/२ चमचा लाल मिरची पूड, १/२ चमचा मीठ, १ चमचा धणे पूड घाला.
  6. आता तुमच्या आवडीच्या सॉस टाका आणि सर्व चांगलं मिक्स करा.
  7. शेवटी तळलेले मका त्यात टाका आणि नीट मिसळा.
  8. कोथिंबीर टाकून सजवा.

हेही वाचा… १०० ग्रॅम पनीरपासून बनवा घरच्या घरी ‘पनीर मलाई कोफ्ता’, रेस्टॉरंटची चव विसरून जाल

पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.